सिडकोतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.....

सिडकोतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.....

सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते तथा शुभोदय फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट), बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

सिडको परिसरात पत्रकार म्हणून काम करत असताना तसेच शुभोदय फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहे. 

विविध कामे करण्यास चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी सागर चौधरी यांनी शनिवारी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले.

याप्रसंगी अजिंक्य घावटे, अरविंद पारखे, अजय साळुंखे, ऋषिकेश कांगणे आदी उपस्थित होते.