मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत उमाकांत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम

मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत उमाकांत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम
मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत उमाकांत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम
मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत उमाकांत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम
मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत उमाकांत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम

नाशिक : राज्यातील रिक्षाचालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दिवसानिमित्त गुरुवारी बाळसाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी आयोजित केलेल्या ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत पंचवटीतील उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांकाचे रोख २१,००० रुपयांचे पारितोषिक पटकाविले. पारितोषिक वितरण सोहळ्यात पालकमंत्री दादासाहेब भुसे बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दिवसानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात आयोजित रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिकचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्क प्रमुख राजूअण्णा लवटे, जिल्हाप्रमुख अजय दादा बोरस्ते, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे, महिला आघाडी महानगरप्रमुख अश्विनीताई देशमाने, युवसेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. बाळसाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी नाशिक शहरात प्रथमच रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यातून ३३८ रिक्षा सहभागी झाल्या होत्या. नाशिक विभागातून प्रथम बक्षिस रोख २१,००० रुपये पंचवटीतील उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षा क्रमांक एमएच १५ एफयू ५०६०, द्वितीय बक्षिस रोख ११,००० रुपये प्रमोद कडजेकर यांच्या रिक्षा क्रमांक एमएच १५ ९४५९, तृतीय बक्षिस ७,००० रुपये सागर चौधरी, चतुर्थ बक्षिस ५,००० रुपये श्रीपाद जाधव आणि पाचवे बक्षिस २,००० रुपये रोख सागर क्षत्रिय यांच्या रिक्षाला मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिक गोकुळ तांबडे, अनिल अष्टेकर, सुनील जोशी, चंद्रकांत पाटील, वसीम शेख, अजित गांगुर्डे यांच्या रिक्षांना देण्यात आले. मुंबई विभागातून इमतीयाझ शेख यांना प्रथम तर हनिफ शेख यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र विभागातून कोल्हापूरच्या सुनील नाळे यांनी प्रथम तर अविनाश दिंडे यांच्या रिक्षाने द्वितीय पारितोषिक देण्यात आले. 

अनेक रिक्षाचालक, मालक आपल्या रिक्षाची आकर्षक पद्धतीने सजावट करतात. नाशिककर रिक्षाचालकांच्या रिक्षांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवाशांसाठी दैनिक, चॉकलेट, फर्स्टएड बॉक्स, वायफाय, टीव्ही, कूलर अश्या विविध सुविधा, आकर्षक सजावट, सामाजिक संदेश देणार्‍या रिक्षा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे फलकही रिक्षावर लावण्यात आले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी बाळसाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, उपमहानगर प्रमुख प्रविण काकड, सुधाकर जाधव, अॅड. अक्षय कलंत्री, अमित खांदवे, श्रावण पवार, माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, दिगंबर मोगरे, संदीप लभडे, किरण राक्षे, राजू पवार, कमलेश भाले, योगेश सूर्यवंशी, किरण फडोळ, राहुल वारुळे, मुश्ताक कुरेशी, कासिफ पिरजादे, सचिन भोसले, स्वप्नील पांगरे, राजेंद्र मोहिते, अजय पंडित, विक्रम काळे, आकाश शिंदे, अविनाश पांगरे, धवल डरंगे, सागर चौधरी, अमित मांडवे, इशाक शेख, विजय लहामगे, हेमंत कोठारी, सुनील पवार, अमित आहेर आदींनी परिश्रम घेतले. 

रिक्षा सौंदर्य स्पर्धेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 

माजी पदाधिकार्‍यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष अमोल आव्हाड, पवन खांडरे, अश्विन जैन, तुषार देशमुख, प्रविण आव्हाड, मोंटी मुतडक, किरण निरभवणे. प्रसाद कानकाटे, विनोद चौधरी यांनी कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. पाथर्डी फाटा परिसरातील महेंद्र वाघमारे, मनोज कोष्टी, संकेत गायकवाड, राजन साळवे, महेंद्र दिवे, लतेश काळे, देवेंद्र काळे, अमोल गीते, संतोष गीते, संदीप दोंदे, प्रसाद बागले, सातपुर विभागातून रोहित घुले, राहुल शिंगाडे यांनी रिक्षा सौंदर्य स्पर्धेप्रसंगी कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री दादा भुसे, पक्ष सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या हस्ते प्रवेशार्थींचा सत्कार करण्यात आला.