रासायनिक युगात सेंद्रियाची गरज
रासायनिक युगात सेंद्रियाची गरज का आहे ?
आजचं युग हे रासायनिक पदार्थांचं युग आहे. शेतीपासून अन्न, वस्त्र, औषधं, सौंदर्यप्रसाधनं प्रत्येक ठिकाणी रासायनिक द्रव्यांचा वापर वाढला आहे., पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यावर, जमिनीच्या निसर्गाच्या संतुलनावर गंभीर परिणाम केला आहे. रासायनिक युगात सेंद्रियाची गरज का आहे?कारण आजकाल शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरतात. पण या रसायनांमुळ जमिनीची सुपीकता कमी होते ,पाणी आणि हवा दूषित होते,अन्नात रासायनिक अंश राहतात,लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि यामुळे सेंद्रिय शेतीची गरज निर्माण झाली आहे.
सेंद्रिय शेती म्हणजे काय ?
सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं न वापरता, नैसर्गिक पद्धतीने शेतीकरतात.. शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट यांचा वापर करतात,जैविक कीटकनाशकं वापरून कीड नियंत्रण करतात,पिकांची फेरपालट (crop rotation) करतात, म्हणजे आळीपाळीने घेतात ,पावसाचं पाणी साठवून वापरतात आणि निसर्गाशी संतुलन राखतात.

सेंद्रिय शेती कशी करतात:
जमिनीची तयारी कशी करतात रासायनिक खतं न वापरता शेणखत,किंवा गांडूळखत टाकून जमीन सुपीक बनवतात.
बियाण्यांची निवड , रोगप्रतिकारक आणि नैसर्गिक बियाण्यांचा वापर करतात.खतांचा वापर कसा करता शेणखत, जीवामृत, गांडूळखत, आणि सेंद्रिय द्रव खतं वापरतात कीड नियंत्रण करण्यासाठी नीम तेल, लसूण-मिरची अर्क किंवा जैविक कीटकनाशकं वापरतात,पिकांची फेरपालटकशी करतात एकाच जमिनीत वारंवार एकच पीक न घेता, आळीपाळीने वेगवेगळी पिकं घेतात म्हणजे जमिनीचं आरोग्य टिकतं,पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचन आणि पावसाचं पाणी साठवणूक वापरून पाण्याची बचत करतात , शेतीतील अवशेष आणि घरगुती जैविक कचरा कंपोस्टमध्ये वापरतात.
अजून सविस्तर माहिती साठी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.

Jagruti_patole




