चंद्र नमस्कार योग साधनेमुळे मनःस्वास्थ्य उत्तम रहाते व विकार बरे होतात. - योगगुरू डॉ.प्रिती त्रिवेदी

चंद्र नमस्कार योग साधनेमुळे मनःस्वास्थ्य उत्तम रहाते व विकार बरे होतात. - योगगुरू डॉ.प्रिती त्रिवेदी

चंद्र नमस्कार योग साधनेमुळे मनःस्वास्थ्य उत्तम रहाते व विकार बरे होतात. - योगगुरू डॉ.प्रिती त्रिवेदी 

नाशिक : योग शास्त्रात ज्याप्रमाणे सूर्य नमस्कार व इतर योग प्रकारांना महत्व आहे. तितकेच महत्त्व चंद्र नमस्कार योग साधनेला आहे. यामुळे मनःस्वास्थ्य उत्तम रहाते, शरिरातील चयापचायाच्या तक्रारी दुर होतात, मानसिक आजार बरे होतात, आपल्या शरिरातील इतर विकार बरे होतात असे प्रतिपादन योगगुरू मानस उपचार तज्ञ डॉ.प्रिती त्रिवेदी यांनी केले. रवि. दिनांक २६ रोजी सायं.६ ते ८ या वेळेत आर पी विद्यालय, पंचवटी येथे चंद्र नमस्कार योग साधना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. प्रिती त्रिवेदी यांनी प्राचीन संस्कृती व काळापासून असलेल्या योगाचे आपल्या जिवनात किती अनन्यसाधारण महत्व आहे ते सांगितले. चंद्र नमस्कार योग साधनेमुळे मन तजेलदार, प्रसन्न रहाते, मनात सतत सकारात्मक विचार येतात, मनावर ताबा मिळवता येतो, शरिरातील अनेक व्याधी बऱ्या होतात असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी व योगगुरू ब्रजमोहन मुंदडा यांनी चंद्र नमस्कार योग साधनेवर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या काळात आपल्याला विना औषधे व्यवस्थित रहायचे असेल तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या योग साधनेचा प्रत्येकाने अंगीकार करावा व योगाचा प्रचार प्रसार करावा, दर महिन्याच्या पौर्णिमेला नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात चंद्र नमस्कार योग साधना कार्यक्रम होणार आहे. नाशिककर नागरिकांनी आपापल्या स्वास्थ्याकरिता या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. प्रिती त्रिवेदी यांनी केले आहे.

याप्रसंगी स्वामी कंठानंद महाराज, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,भाजप अध्यक्ष प्रशांत जाधव,आ.ॲड.राहुल ढिकले, योगगुरू डॉ. प्रिती त्रिवेदी, सरचिटणीस सुनिल केदार व नाना काशिनाथ शिलेदार, चिटणीस अमित घुगे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, दिगंबर धुमाळ, रुची कुंभारकर, शिवस्वरूप चौहान, मंजु चौहान, अशोका ग्रुपच्या आरती बिजलानी, डॉ. किशोर थोरात, डॉ. प्रमोद कलोस, मा. डी वाय एस पी विजय सोनवणे आदी सह शहरातील योगसाधना उपस्थित होते.