बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात सम्पन्न....

बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात सम्पन्न....

नाशिकरोड : 

          गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात हिरक महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात ते उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.  मंजुषा कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. के. सी. टकले, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे,  उपप्राचार्य डॉ.  आकाश ठाकूर, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष डॉ.  लक्ष्मण शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

        प्रारंभी दीप प्रज्वलन व दिवंगत महान शिक्षण तपस्वी संस्थेचे माजी अध्यक्ष एस. बी. पंडित, डायरेक्टर जनरल शिक्षण महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ आकाश ठाकूर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागतपर प्रास्ताविक केले. यावेळी व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून महाविद्यालयातील उपक्रमांचा अहवाल माजी विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आला.  यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून आपल्या महाविद्यालयात जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा देत शिक्षणाबरोबरच विचार, संस्कार, व्यक्तिमत्व विकासाचे पैलू, स्वतःमधील कला विकसित करीत बोलते केले तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये एक बॉण्डिंग, ऋणानुबंध तयार झाले, छन्द जोपासता आले असे सांगून शिक्षकांप्रती व महाविद्यालयातप्रति ऋण व्यक्त केले. यात माजी नाशिकरोड प्रभाग सभापती प्रशांत दिवे, अमित पवार, दीपक पाटील, ऍड. बबन मुठाळ, पत्रकार, रवींद्र जाधव, केदार बिवलकर, जज ऍड शोभा पवार (बालहक्क ), रोहन जाधव, बबन मुठाळ, साहिल जाधव(पुणे ) , प्रा. डॉ.सुवर्णा मोरे ( चाळीसगाव ) , रोहन देशपांडे यांनी आपले  आठवणी अनुभव सांगितले. 

         उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विभागीय सचिव डॉ.  राम कुलकर्णी यांनी, " शिक्षणाबरोबरच बोलणे, लेखन, नेतृत्व करण्याची कार्यशाळा या महाविद्यालयाने माझ्यासमवेत अनेकांना दिली. शिक्षणातून निर्भयता निर्माण झाले पाहिजे. पाच प्रकारची भीती यात मृत्यू, वार्धक्य, अनारोग्य, बदनाम अनामिक अज्ञान हे असून सकारात्मक विचाराने प्रत्येक गोष्टीवर जीवनात विजय मिळवता येईल. आपल्या कामाला न्याय द्या, " असे सांगितले.

        अध्यक्षीय  मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ.  मंजुषा कुलकर्णी यांनी, "  गोखले एज्युकेशन संस्थेने सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या मार्गदर्शनात दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेऊन अनेक विद्यार्थी घडवले. पंडित सरांनी नाशिकरोड महाविद्यालयात १५ वर्ष सेवा देऊन एक विशिष्ट शिस्त लावली. क्रीडा क्षेत्रात अनेक रेकॉर्ड्स झालेत.अनेक कुशल नेतृत्व व्यावसायिक, उद्योजक घडवले, आपले उज्ज्वल करिअरची घोंडदौड अशीच यशस्वी करतांना आम्हाला सार्थ अभिमान आहे , " असे प्राचार्य सांगितले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  सुधाकर बोरसे यांनी केले तर आभार डॉ.  लक्ष्मण शेंडगे यांनी मानले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करिअर करत असलेले माजी विद्यार्थी प्रशांत दिवे, प्रकाश कोरडे ,  विलास गांगुर्डे, पल्लवी चव्हाणके, जतीन रावल, पत्रकार रविंद्र जाधव, नितीन धानापुने, केदार बिवलकर,  उमेश आवारे, ऍड. भगवान मुठाळ , राजेश गवारे, बैंगलोर येथील डॉ. आदिती चौधरी, अमोल भगत, यश शिरसाठ, विनीत सातपुते, विनोद बर्वे , हिमांशु पवार ,नीता बुधवानी,सुनिता बगाड, विद्या पाटील , अश्विन भालेराव, संदीप आहेर , मुकुंद वैद्य अशी नामवंत विद्यार्थी उपस्थित होते.