बिटको महाविद्यालयात जागतिक योगदिनी योगासनांची प्रात्यक्षिके व व्याख्यान....

बिटको महाविद्यालयात जागतिक योगदिनी योगासनांची प्रात्यक्षिके व व्याख्यान....

नाशिकरोड :-" स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक सकारात्मक ऊर्जेसाठी, निरामय स्वास्थ्य व आरोग्यासाठी योगसाधना आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम यांमुळे शरीर लवचिक होऊन हाडांना, स्नायूंना बळकटी येते तसेच शरीरावरील ताण तणाव कमी होण्यास उत्तम आरोग्यासाठी मदत होते " असे मार्गदर्शन करताना पतंजली विद्यापीठाचे योगाचार्य  अशोक पाटील यांनी केले.

       गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय वतीने आयोजित दि.२१ जुन रोजी जागतिक योगदिना निमित्त महाविद्यालयाच्या  मैदानावर  झालेल्या व्याख्यान व योग प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते.व्यायाम आणि योगसाधना मधील फरक सांगून विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर झाली. याप्रसंगी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रागिणी भवर, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे,  क्रीडाशिक्षक डॉ. धनंजय बर्वे, योगेश शिंदे, माजी क्रीडाशिक्षक श्री. नामदेव मुठाळ सर, योगेश महाजन, सौ. आर. एस. पाटील, संजय p विठ्ठल कोठुळे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश शिंदे यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना रागिणी भवर यांनी, "योगसाधना ध्यानधारणा आणि आयुर्वेद ही आपल्या देशाची परंपरा असून रोज घरच्या घरी  किमान एक तास सूर्यनमस्कार, योगाभ्यास केल्यास त्याचे अनेक फायदे व सकारात्मक परिणामांची अनुभूती मिळते, "असे सांगितले. याप्रसंगी  विविध ध्यान, प्राणायाम प्रात्यक्षिक व आसने विद्यार्थी व शिक्षकांकडून करून घेतली. कार्यक्रमास  कनिष्ठ महाविद्यालयाचे  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच  विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंदे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे यांनी मानले.