खरशेत आश्रम शाळेत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात पार

खरशेत आश्रम शाळेत दिनांक १६ जुलै २०२५ रोजी आर्थिक साक्षरता कार्यक्रम पार पडला. या उपक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. बडगुजर साहेब, मा. शेवाळे मॅडम, मा. सौ. चौधरी मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निकुंभ मॅडम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. प्रा. श्री. शिर्के सर, प्रा. श्री. शिंदे सर, प्रा. सौ. सपकाळ मॅडम, प्रा. श्री. वाघेरे सर, श्री. वैद्ये सर तसेच एस. एन. एस. टीम उपस्थित होती.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. विशेष मार्गदर्शन Lead Bank Counselor, नाशिक झोनच्या सौ. अनुराधा लोढे मॅडम यांनी केले. इयत्ता ८ वी ते १२ वी चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बचतीचे महत्त्व, बँकिंग सेवा व आर्थिक नियोजन याची जाण निर्माण झाली.