प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील डॉ. रारावीकर पुरस्कार जाहीर

प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील डॉ. रारावीकर पुरस्कार जाहीर

नाशिक (प्रतिनिधी) मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील डॉ. अरुणा रारावीकर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बिटको महाविद्यालााचे प्रभारी प्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांना जाहीर झाल्याची माहिती अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाहक खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे यांनी दिली.

डॉ. रारावीकर पुरस्कार हा अखिल भारतीय पातळीवर उत्कृष्ट आर्थिक लेखासाठी दिला जातो. डॉ. शहाणे यांनी लिहिलेल्या कांदा समस्येवरील "कांदा किमतीचे चक्रव्यूह भेदणार कसे" या आर्थिक लेखाला सदर पुरस्कार जाहीर झालेला आहे. 

          डॉ. कृष्णा शहाणे हे बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य या पदावर कार्यरत असून आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांनी त्यांची 15  आणि इतर प्रकाशना मार्फत 5 अशी अर्थशास्त्रावरील एकूण 20 क्रमिक पुस्तके प्रकाशित केलेली असून. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून अर्थशास्त्र विषयावरील विविध संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड मुंबई खालसा कॉलेज मुंबई केळकर कॉलेज मुंबई यांच्या अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. अर्थशास्त्र या विषयावर आकाशवाणी केंद्र नाशिक येथून त्यांची अनेक प्रख्याने प्रसारित झालेली आहेत. याशिवाय ते कांदा प्रश्नाचे जाणकार असून  या विषयावर ते पीएचडी प्राप्त आहेत.

महाराष्ट्रातील कांदा प्रश्नाचे ते जाणकार असून या विषयावर त्यांनी संशोधन केलेले आहे. याशिवाय शेती विकास या संदर्भातील विविध ठिकाणी ते स्तंभ लेखन करतात. 

डॉ. रारावीकर पुरस्काराचे वितरण दिनांक २ ते  ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अकोला येथे होत असलेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाईल.

           याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, श्री कल्पेश गोसावी, अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. सुहासिनी संत, नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सहाय्यक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहाय्यक ब्रांच सेक्रेटरी डॉ. प्रणव रत्नपारखी, कुलसचिव गिरीश नातू, प्रा. जयंत भाभाे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे