नाईक महाविद्यालय सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले विश्रामगड येथे भेट देऊन राबवली स्वच्छता मोहीम.

नाईक महाविद्यालय सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले विश्रामगड येथे भेट देऊन राबवली स्वच्छता मोहीम.

दिनांक. 19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथील वरिष्ठ कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी  विश्रामगड(पट्टा किल्ला) येथे भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या गडावरील विविध ऐतिहासिक स्थळांची व वास्तूंची माहिती करून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी गडावरील कचरा उचलून तेथील परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल गडावरील पर्यटक व गावकरी यांनी विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे आभार मानून कौतुक केले. 

यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांनी टाकेद येथील शिव मंदिरास भेट देऊन तेथे देखील स्वच्छता मोहीम राबवली.

विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या अभिनव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

इतिहास विभाग प्रमुख स.प्रा अमोल आव्हाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योती गायकवाड व हिंदी विभाग प्रमुख स.प्रा. पुनम कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी आणि कला व वाणिज्य विभागातील एकूण 35 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी केला. यामध्ये ओमकार कणसे, अजिंक्य बोडके, ज्योती भांगरे, सुनिता वाडगे, प्रांजल रूपवते, सुमन राजभर, निकिता तांबे (TYBA) 

गायत्री रसाळ, साक्षी ढाकरगे, रूपाली गोळेसर, श्रद्धा सुकेनकर (TYBCOM)

 मोनिका गामने, गौरी बोडके, साईनाथ खताळे, दर्शन चोरपगार (SYBCOM) 

वैभव फड,मनीषा आव्हाड, ऋतुजा बलक, प्रणव आव्हाड, रोहित बोडके, रामेश्वर खाटीक, निलेश मेंगाळ, आदित्य कटारे, निकिता कुशारे,माधुरी घुले(FYBCOM)

राजेश्वरी साळवे,सानिया शिंदे, प्रणाली बोडके,सानिया भवरे प्रचाली माळी,अजय पावरा

(FYBA) या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. जुनिअर विभागातील स.प्रा. ज्ञानेश्वर चकोर यांनी देखील या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.