सातपूर महावि‌द्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन यावर व्याख्यान संपन्न......

सातपूर महावि‌द्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन यावर व्याख्यान संपन्न......

मराठा विद्‌या प्रसारक समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्‌यालय सातपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त 'अंधश्र‌द्धा निर्मूलन' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. ए. पाटील हे होते तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. गोराने सर व सारिका गुजराती मॅडम ह्याही उपस्थित होत्या. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून तुम्ही घडलेल्या घटनेमांगचे कारण शोधू शकता त्याची काही प्रात्यक्षिके गोराने सरांनी स्वयंसेवकांना दिली. तसेच स्त्री अंधश्रद्धेची वाहक आहे आणि स्त्रीच अंधश्र‌द्धेला बळी पड़ते यावर सारिका गुजराती मॅडम यांनी स्वयंसेवकांना आपल्या मनोगतातून पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी वाय बी. ए.ची दिपाली तिरमले या वि‌द्यार्थिनींनी केले व आभार प्रदर्शन एफ. वाय. बी. ए ची विद्यार्थिनी प्रतीक्षा मोरे या विद्यार्थिनींनी केले या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. डी. शेंडगे सर आय . क्यू. ए.सी कॉर्डिनेटर गांगोडे सर, लोखंडे मॅडम, गाडे मॅडम हे उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी महावि‌द्यालयातील सर्व वि‌द्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली