क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे संविधान दिन उत्साहात साजरा

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे संविधान दिन उत्साहात साजरा

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त मा. श्री. नामदेवराव काकड साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मा. श्री. समाधान गायकवाड साहेब यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, त्याची मूलतत्त्वे आणि त्याची निर्मिती प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मंगल सांगळे यांनी संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली सानप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर चकोर यांनी केले.

या प्रसंगी परीक्षा विभाग व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.