व्ही.एन.नाईक महाविद्यालयात करियर गायडन्स सेमिनार संपन्न

नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुंबई येथील सी.एम.ए गुरुकुल संस्था तसेच महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व बीबीए विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि.२५ सप्टेंबर रोजी करिअर गायडन्स विषयक सेमिनार उत्सहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सानप होते.उपक्रमाची सुरुवात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली.याप्रसंगी मोटिवेशनल स्पीकर प्रा.संजय अपान,सीमए गुरुकुल संस्थेचे संचालक सीए मोनित शाह वाणिज्य विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.धीरज झाल्टे,बीबीए विभागप्रमुख प्रा.सुदाम भाबड,डॉ.रुपाली सानप, प्रा.नीता सांगळे,प्रा.हेमलता दराडे,प्रा.कैलास चौधरी,प्रा.वैशाली वाघ,प्रा.रेश्मा कुटे,प्रा.कामिनी वाघ,प्रा.शीतल इंगळे,ध्यान शेट्टी यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रा.संजय अपान म्हणाले की वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत,यासाठी करिअर निवडतांना खूप काळजी घेतली पाहिजे,आपल्या ध्येयावर फोकस करून सतत प्रयत्न केल्यास निश्चित चांगले यश मिळू शकते.आपल्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण फार महत्वाची भूमिका बजावते असेही ते म्हणाले.याप्रसंगी आपल्या मनोगतात चार्टर्ड अकाऊंट मोनित शाह म्हणाले की फक्त १८ महिन्यांचा जागतिक पातळीवरील व्यासायिक अभ्यासक्रम यू.एस.सी.एम.ए चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यास भारतातील १५० पेक्षा अधिक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे,तसेच त्यांनी उपस्थितांना या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.संजय सानप म्हणाले की विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण कोर्सेस पूर्ण करून,अद्यावत पद्धतीचे शिक्षण अवगत केले पाहिजे,अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी उत्तम करिअर करण्यासाठी फायदा करून घ्यावा. प्रास्ताविकातून डॉ.धीरज झाल्टे यांनी प्रस्तुत सेमिनारची भूमिका मांडून अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले.प्रा.सुदाम भाबड यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेश्मा कुटे यांनी केले तर आभार प्रा.कैलास चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य,उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विद्याशाखेतील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.