श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी

श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी
शिबिरार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना खा. भास्कराव भगरे सर शेजारी श्री विजय पगार, प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, कार्यक्रम अधिकारी सचिन भामरे डॉ. राकेश घोडे, प्रा. तुषार वाघ, ग्रामस्थ इत्यादी.

देवळा :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा विभाग, कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. ७ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत  रामेश्वर येथील श्रीक्षेत्र सहस्रलिंग या ठिकाणी संपन्न होत आहे. या शिबिराचे उद्घाटन दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. भास्करराव भगरे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. 

विद्यार्थ्यांनी श्रमदानाबरोबरच संस्कार मूल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती मन लावून प्रामाणिकपणे समाजामध्ये जाऊन समाजाच्या गरजा ओळखून त्यांना मदत करत असेल समाजासाठी झटत असेल तर त्याला लोकांचा प्रतिसाद नक्कीच मिळतो आणि ती व्यक्ती उच्च स्तरापर्यंत पोचू शकते त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून मी आपणासमोर आलेलो आहे असे प्रतिपादन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मविप्र समाजाचे संचालक मा. विजू (नाना) पगार यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सांगितले की, आपल्या आई-वडिलांची मान समाजामध्ये कधीही खाली जाणार नाही याची काळजी प्रत्येक मुलाने, मुलीने घेतली पाहिजे, आपला त्यांना अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं काम करावे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी सर्व शिबिरार्थी स्वयंसेवकांना शुभेच्छा व पुढील वर्षी सुद्धा रामेश्वर गावच्या ग्रामस्थांनी आपले शिबिर या गावी व्हावे अशा पद्धतीने पुन्हा मागणी करायला पाहिजे असं काम स्वयंसेवकांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी रामेश्वर गावातील सरपंच मा. केवळ गांगुर्डे, उत्तमराव पगार, गोविंदा आप्पा पगार, माणिक पगार, नितीन पगार, सुनील पगार, व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व जिल्हा समन्वयक डॉ. डी.के. आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. राकेश घोडे, प्रा. तुषार वाघ,  प्रा. सचिन भामरे, श्रीम.नीलिमा पाटील दिपक पवार सर्व शिबिरार्थी स्वयंसेवक  उपस्थित होते. कु. चेतना अहिरराव, कु. चेतना खैरनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जयमाला चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभर मानले.