नासिक रोड कॉलेज मध्ये 'विश्व हिंदी दिवस' साजरा करण्यासाठी'हिंदी सप्ताह आणि हिंदी काव्यवाचन स्पर्धा' आयोजित
सोमवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नासिक रोड कॉलेजच्या हिंदी विभागाने 'विश्व हिंदी दिवस' साजरा करण्यासाठी कॉमर्स लॅबमध्ये 'हिंदी सप्ताह आणि हिंदी काव्यवाचन स्पर्धा' आयोजित केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयच्या प्राचार्य प्रो. डॉ. मंजूषा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
यावेळी कला संकायचे उपप्राचार्य डॉ. अनिल कुमार पठारे, विज्ञान संकायचे उपप्राचार्य डॉ. के. सी. टकले, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकुर, ज्येष्ठ साहित्यिक श्री. अरुण घोडेराव, प्र. हिंदी विभागाध्यक्ष डॉ. संतोष पगार, प्रो. चंद्रकांत तारू, डॉ. संदीप तपासे, मराठी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. कौतिकराव लोखंडे, इंग्रजी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. घनश्याम बाविस्कर, प्रो. सचिन बागुल, संदीप अरोटे यांसह विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. हिंदी काव्यवाचन स्पर्धेत एकूण २२ प्रतिभागी सहभागी झाले. काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. शरद नागरे आणि श्रीमती मीना शिंदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्ञानेश्वरी राक्षे आणि कु. साक्षी कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले.