तहसिल कार्यालय, सिन्नर येथून विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या भेटीला या उपक्रमाची सुरुवात.

तहसिल कार्यालय, सिन्नर येथून विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या भेटीला या उपक्रमाची सुरुवात.

सिन्नर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथील राज्यशास्र विभागातील विद्यार्थ्यांनी तहसिल कार्यालय, सिन्नर येथे शैक्षणिक भेट देऊन प्रशासनाच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या भेटीदरम्यान तहसिलदार देशमुख सर, नायब तहसिलदार मुंदडा तथा संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी महसूल विभागाचे कार्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवा, तसेच प्रशासनातील जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध शंकांचे निरसन करून प्रत्यक्ष कार्यालयीन कार्यपद्धतीची ओळख करून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासनव्यवस्थेबाबत व्यवहार्य ज्ञान मिळाले असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः याचा लाभ झाला. “विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या भेटीला”या उपक्रमाची सुरुवात तहसिल कार्यालय सिन्नर येथून झाली पुढील आठ दिवसात सिन्नर मधील विविध सरकारी कार्यालयात जाऊन हे विध्यार्थी भेटी देणार आहे. या उपक्रमाची संकल्पना, राज्यशास्र विभाग प्रमुख स.प्रा.संतोष आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या भेटीदरम्यान राज्यशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी स. प्रा. संतोष आव्हाड, स.प्रा.ऋषिकेश आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पखाले सर उपस्थित होते.