युवास्पंदन स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या
नावीन्यपूर्ण कलागुणांचे दर्शन
क. का. वाघ महाविद्यालय युवास्पंदन स्पर्धा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष विश्वास मोरे यांची प्रतिपादन
पिंपळगाव बसवंत २९.१.२०२४
महाविद्यालयीन स्तरावर पुस्तकी ज्ञानाबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असते. यामध्ये वक्तृत्व वाद-विवाद, गायन, नाटक सादरीकरण इ. कलांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना वाव मिळतो. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी सहभाग घेऊन आपल्यातील विविध कला सादर करून आपल्या आवडीनुसार क्षेत्रात आपले नाव लौकीक मिळवू शकतात. भविष्यात हेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन मोठ - मोठे कलाकार होऊ शकतात असे, प्रतिपादन मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात युवास्पंदन स्पर्धा प्रथम फेरी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, राजाराम तांबे, विनोद राठोड, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, जाधव मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, युवास्पंदन प्रमुख डॉ. पवनजय सुदेवाड, प्रा. महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे म्हणाले, विद्यार्थी या स्पर्धांमधून विविध स्पर्धांमधून जीवनात फक्त आनंदच मिळत नाही तर भविष्यात आपलं एक भक्कम स्थान निर्माण करू शकतो. म्हणूनच महाविद्यालयात युवास्पंदन सारखे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीला हातभार लावण्याचे मोलाचे काम महाविद्यालयात होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवास्पंदन प्रमुख पवनजय सुदेवाड यांनी स्पर्धेचे महत्त्व, नियम व उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेंद्र गायकवाड व आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे यांनी केले. यावेळी स्पर्धक म्हणून आलेले बहुसंख्य विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.
फोटो ओळ
क का. वाघ महाविद्यालयात युवास्पंदन स्पर्धा प्रथम फेरी कार्यक्रमाच्या उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, यावेळी व्यासपीठावर प्रा. रवींद्र मोरे,यावेळी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, राजाराम तांबे, विनोद राठोड, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, जाधव मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, युवास्पंदन प्रमुख डॉ. पवनजय सुदेवाड, प्रा. महेंद्र गायकवाड आदी.