बँकॉक थायलंड येथे होणाऱ्या सॉफ्टबॉल एशियन कपसाठी क. का. वाघ पिंपळगाव ब. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड

दिनांक 2 जून ते 7 जून 2025 अंतर्गत बँकॉक थायलंड येथे होणाऱ्या सॉफ्टबॉल एशियन कपसाठी 23 वर्षा खालील चॅम्पियनसाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ पिंपळगाव ब. महाविद्यालयातील कु. वेदांत दीपक राऊत, कु. प्रवीण गोरख चव्हाण या खेळाडूंची निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे मविप्र समाज शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, मविप्र निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका श्रीमती शोभाताई भागवत बोरस्ते, मविप्र समाजाच्या सर्व तालुक्यांचे संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र मोरे, सुनील पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफे. (डॉ.) सुरेश जाधव, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, प्रा. भगवान कडलग, क्रीडा शिक्षक प्रा.हेमंत पाटील, प्रा. सागर कडलग, नाशिक जिल्हा व मनपा सॉफ्टबॉल असोसिएशन सचिव हेमंत देशपांडे, वरिष्ठ खेळाडू वारिस काजी, विनय गोसावी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.