अडचणीवर मात करत यशस्वी उद्योजक व्हा..... प्रसिद्ध उद्योजक श्री मारुती कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

अडचणीवर मात करत यशस्वी उद्योजक व्हा..... प्रसिद्ध उद्योजक श्री मारुती कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत नव उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सिन्नर शहरातील प्रसिद्ध उद्योजक मा श्री मारुती कुलकर्णी (सीईओ, रेक्टिफाइस कॅपॅसिटर) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक मा श्री जयंत आव्हाड यांनी भूषविले. यावेळी संस्थेचे संचालक श्री समाधान गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले तसेच उद्योजक श्री अजय शेंडकर,श्री प्रतिक सानप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योजक श्री मारुती कुलकर्णी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक बनणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले तसेच अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून मी देखील स्वतःला एक यशस्वी उद्योजक म्हणून घडवले असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे संचालक श्री समाधान गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांचे या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी देखील सर्वांना या कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संचालक श्री जयंत आव्हाड यांनी देखील विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात एक यशस्वी उद्योजक बनण्याची जिद्द ठेवली तर विकसित भारताचे स्वप्न दूर नाही असे नमूद केले. 

या निमित्ताने उद्योजक श्री मारुती कुलकर्णी यांनी महाविद्यालयास "आर्चीवर्स ऑफ महाराष्ट्र" या पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातून एकूण 150 विद्यार्थी सहभागी झाले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा.अमोल आव्हाड यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा. पुनम कुटे यांनी आभार व्यक्त केले. 

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.