पंचायत समिती सिन्नर येथे विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या भेटीचा दुसरा दिवस
सिन्नर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय, सिन्नर येथे शैक्षणिक भेट देऊन ग्रामीण प्रशासनाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या प्रसंगी गटविकास अधिकारी अशोक भवारी सर व संबंधित सर्व विभाग प्रमुखांनी पंचायत समितीच्या विविध योजना, ग्रामीण विकास कार्यक्रम, तसेच शासकीय अंमलबजावणी प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनातील जबाबदाऱ्या व कार्यपद्धती समजून घेतली.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण प्रशासनाची व्यवहार्य माहिती मिळाली असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन लाभले. पुढील काही दिवसांत सिन्नर मधील विविध सरकारी कार्यालयात जाऊन हे विध्यार्थी भेटी देणार आहे. या उपक्रमाची संकल्पना, राज्यशास्र विभाग प्रमुख स.प्रा.संतोष आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पखाले सर ,स. प्रा. संतोष आव्हाड, स.प्रा. प्रशांत गायकवाड व राज्यशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी कांचन आव्हाड,संजीवनी यादव, अजिंक्य बोडके, निकिता सोनवणे प्रिया लांडगे, आदिती लांडगे, सिद्धेश आव्हाड, ओमकार रोडे, शुभम गांजवे, प्राजक्ता दराडे, ज्ञानेश्वरी गाडेकर, ईश्वर सांगळे, कांचन कुशारे उपस्थित होते.


digitalnashik_admin




