नाथ संप्रदायिक ' आदेश ' दिवाळी अंकाचे प्रकाशन दिमाखात संपन्न
नाशिक - सालाबाद प्रमाणे नाथ संप्रदायिक ' आदेश ' दिवाळी अंकाचे मराठी व हिंदी भाषेमध्ये प्रकाशन रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी श्री काळाराम मंदिरा मागील, शनि चौक जवळ, स्वाद हॉल, भाविदिशा अपार्टमेंट, पंचवटी, नाशिक येथे उत्साहात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी अंकाचे संपादक श्री गणेशनाथ जयराम मोरे ( टीटवाळा ) यांसह प्रमुख अतिथी डॉ.श्री. गजानन विठोबा बाजड- पाटील (माऊली) विशेष अतिथी म्हणून श्री काळाराम मंदिर संस्थानचे पुजारी - नरेश जयराम पुजारी, सचिन गजानन पुजारी यासह माजी जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड श्री नवनाथ गायकर - साहित्य परिषद अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यकारी मंडळातील श्री भगवाननाथ मोरे , श्री राजू घुले, अनिल भुसारी, नरेशनाथ मोरे, श्री निलेशनाथ मोरे, भरतकुमार जोगी, मधुकरनाथ चव्हाण, विशालनाथ जोगी, शरदनाथ पंजे, सुनील पंजे, माणिकनाथ कानडे , माणिकनाथ पवार, श्री सुरेशनाथ मोरे, प्रकाश बर्वे यासह नाथ बंधू भगिनीं आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉ. गजानन पाटील व माजी जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड यांनी यांनी नाथ संप्रदाया विषयी व हे साहित्य नाथ भक्तांसाठी किती अनमोल व मार्गदर्शक आहे याबाबतचे गौरव उद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजयनाथ परमसागर यांनी केले.तर आभार भगवाननाथ मोरे यांनी मानले .

digitalnashik_admin




