व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात 'अविष्कार संशोधन स्पर्धा' संपन्न
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, येथे महाविद्यालयस्तरीय अविष्कर संशोधन स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जीएमडी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व परीक्षा विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र अगवाने सर हे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक समाधानजी गायकवाड, संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉ. शरद काकड तसेच सेवक संचालक विवेक गामने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले, आदी मान्यवर उपस्थित होते.
अविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक समाधानजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयातील कला वाणिज्य, विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन पोस्टर तयार केले होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी संशोधन वृत्ती, संशोधन क्षेत्रातील इतिहासातील उदाहरणे, व अविष्कार स्पर्धेचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत शुभम आव्हाड या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळवला तसेच नम्रता कातकडे व पल्लवी पठारे या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच मयुरी सानप या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवला.
विजय झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती हेमाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

digitalnashik_admin




