निफाड तालुक्यात SHG क्रेडिट कॅम्प उत्साहात संपन्न
निफाड : निफाड ब्लॉकमध्ये आज स्वयं-सहायता बचत गटांसाठी (SHG) आयोजित करण्यात आलेला SHG क्रेडिट कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या कॅम्पमध्ये एकूण ५० बचत गटांच्या कर्जांना मंजुरी देण्यात आली असून, एकूण ₹१.६५ कोटींच्या कर्ज रकमेची मंजुरी मिळाली.
यावेळी झोनल मॅनेजर श्री. देशमुख सर यांनी SHG सदस्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे बचत गटातील सदस्यांना मोठा उत्साह व प्रोत्साहन मिळाले. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज सुविधांचा योग्य वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी श्री. पाटील, निफाड BM श्री. आधार बाविसकर, MSRLM BMM श्री. खिरनार, RSETI फॅकल्टी श्री. समीर कुलकर्णी तसेच FLC सौ. अनुराधा लोंढे यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.
कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शाखा व्यवस्थापक व बँक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे SHG सदस्यांना कर्ज मंजुरीची प्रक्रिया आणि उपलब्ध आर्थिक सुविधांबाबत मार्गदर्शन मिळाले.
५० SHG कर्जांना मंजुरी आणि ₹१.६५ कोटींची कर्जरक्कम मंजूर झाल्याने निफाड तालुक्यातील बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. एकूणच, निफाड येथील SHG क्रेडिट कॅम्प यशस्वी ठरला.
आधार बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले

digitalnashik_admin




