मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी तालुकास्तरीय पालक अधिकारी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर देणार भर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी तालुकास्तरीय पालक अधिकारी  अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर देणार भर

नाशिक : ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषद नाशिककडून तालुकास्तरीय पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केली. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने  हे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानाचा उद्देश आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून हे अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर राबविण्यात येणार आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण आणि मूल्यमापन यंत्रणा स्थापन करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांना तालुकानिहाय पालक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे अधिकारी त्यांच्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन निर्देशांकानुसार प्रगतीचा अहवाल सादर करतील. तसेच अभियानाच्या कालावधीत ग्रामपंचायतींना येणाऱ्या अडचणींबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वय साधतील. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत व पंचायत समित्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करावी यासाठी सदर पालक अधिकारी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.

असे आहेत पालक अधिकारी–

इगतपुरी - महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.)

नाशिक - डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

त्र्यंबकेश्वर – हर्षदा बडगुजर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी

पेठ – डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

सिन्नर – दीपक पाटील, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन

कळवण – डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

दिंडोरी – सुनील दुसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.)

बागलाण – सरोज जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

देवळा – भास्कर कनोज, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

चांदवड – संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता बांधकाम इवद-१

मालेगाव – पंकजकुमार मेतकर, कार्यकारी अभियंता बांधकाम इवद-२

नांदगाव – दिलीप तारडे, कार्यकारी अभियंता बांधकाम इवद-३

सुरगाणा – संजय शेवाळे, कृषि विकास अधिकारी

येवला – गंगाधर निवडंगे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.)

निफाड – वैशाली ठाकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी