स्वर रंग वतीने संगीतसेवा मानवसेवा कार्यक्रमात ' गीत व नृत्याचा ' बहारदार अविष्कार
नाशिकरोड :- " तू कितनी अच्छी है प्यारी प्यारी है ओ माँ, एहसान तेरा होगा मुझपर, लाजून हासणे अन हासून ते पाहणे, दिल दिवाना, हवा के साथ साथ घटा के संग संग, घर मोरे परदेसिया, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, तुम पास आये यु मुस्कुराये, मेरा नाम चीन चीन चू, रोते रोते हसना सीखो, जानेमन जानेमन तेरे दो नयन, ही चाल तुरुतुरु, याद किया दिल ने कहा हो तुम अशी एक से एक गीत व नृत्य सादर करून उपस्थित सर्व जेष्ठ श्रोत्यांची दाद मिळाली.
निमित्त होते... स्वर रंग ईव्हेन्ट शैलेश सोनार प्रस्तुत संगीतसेवा- मानवसेवा गीत व नृत्याचा अनोखा अविष्कार नजराणा दि.१४ जुन २०२५ रोजी पाथर्डी फाटा येथील ' मानवसेवा ओल्ड एज केअर वृद्धाश्रम ' येथे उत्साहात आनंदात सादर झाला. या कार्यक्रमात स्वतः गायक शैलेश सोनार यासह गायिका स्वरा थोरात, अर्चना सोनवणे, मयुरी मुरुडेश्वर, अश्विनी कुलकर्णी, निवेदिता कस्तुरे, संगीततज्ञ किशोर वडनेरे, गायक सुरेंद्र चौधरी, दीपक सूर्यवंशी , प्रकाश महाले, विनोद साखरे, आनंद नंदगिरवार, संजय परमसागर, रुपेश शिंपी, श्रीराज सोनार आदि गायकांनी हिंदी, मराठी गाणी सादर केली तसेच नृत्यांगना वेदिका नंदगिरवार, राजनंदिनी सोनार, याज्ञश्री दारवेकर यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थित ज्येष्ठ आबाल वृद्ध नागरिकांची वाहवा मिळवत रंगत आणली . याप्रसंगी आयोजक श्री शैलेश सोनार यांनी आपला वाढदिवस मानवसेवा वृद्धाश्रमात साजरा करून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले .सर्व कलाकारांचे वृद्धाश्रमाच्या संचालिका ललिताताई नवसागर व सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष टी. एल. नवसागर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमास यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन रोहिणी सोनार यांनी खुमासदार पणे केले.