बिटको कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शालेय मैदानी स्पर्धेत सुयश....

नाशिकरोड : मीनाताई ठाकरे स्टेडियम, नाशिक येथे संपन्न झालेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य प्राप्त करून दिले व विभागीय स्तरावर निवड झाली. यात -
१) शिवम योगेश पाडुस्कर- तिहेरी उडी प्रथम
२) शिवम योगेश पाडुस्कर - लांब उडी प्रथम
३) अथर्व संजय मुदलियार - तिहेरी उडी द्वितीय
४) अथर्व संजय मुदलियार - लांब उडी द्वितीय
५) अजित विजय शिंदे- थाळी फेक द्वितीय
६) रीले टीम ४×४०० (मुले) -तृतीय
१) रोहित भास्कर कातारे
२) जेद जावेद शाह
३) दर्शन सुभाष भाबड
४) आदर्श राजेश परदेशी
५) अजित विजय शिंदे
विद्यार्थ्यांच्या या सुयाशाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे , सचिव डॉ. सौ.दिप्ती देशपांडे , चेअरमन डॉ. सौ. सुहासिनी संत ,नाशिक विभागाचे विभागीय सचिव डॉ.राम कुलकर्णी , प्रकल्प संचालक प्रा .पी. एम. देशपांडे, आस्थापना संचालक श्री.शैलेश गोसावी ,संचालक ( क्यू. आणि एस. ) श्री.अक्षय देशपांडे , नाशिक विभागाचे सहाय्यक विभागीय सचिव डॉ.श्री. व्ही.एन.सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे , उपप्राचार्या प्रणाली पाथरे, पर्यवेक्षिका राधा पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक योगेश शिंदे, वरीष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. धनंजय बर्वे आणि जिमखाना सहाय्यक श्री. विठ्ठल कोठुळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी पुढील विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.