व्ही. एन. नाईक कॉलेज, सिन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उदघाटन कार्यक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन बुधवार दिनांक १५ जानेवारीला करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस आयुक्त डी. पी. आव्हाड होते.
सदर शिबिर २१ जानेवारी पर्यंत पास्ते या गावी राबविण्यात येणार आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून आजच्या तरुणांनी सामाजिक दायित्व स्वीकारण्याची खूप गरज असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. पी. आव्हाड उदघाटन प्रसंगी बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर रा.से.यो. अधिकारी प्रा. मंगल सांगळे यांनी येत्या सात दिवसांत पास्ते गावात राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल तसेच तरुणांना ध्येयाप्रति प्रेरित करण्याबद्दल मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक हेमंत नाईक, समाधान गायकवाड तसेच संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सदर शिबिरास शुभेच्छा देत नवीन उपक्रम राबविण्याबाबत आवाहन केले. यावेळी पास्ते गावातील ग्रामसेवक अशोक फुके, माजी सरपंच शरद आव्हाड, डी.पी.आव्हाड विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश सानप, तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळनाना आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य भाऊलाल घुगे, रामा आव्हाड आदी मान्यवरांनी सदर शिबिरार्थींचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख स.प्रा. संतोष आव्हाड, विद्यार्थी विकास अधिकारी स.प्रा.डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा. पूनम कुटे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा. स्वाती चोथवे ह्यांनी केले तर क्रीडा विभाग प्रमुख सहा.प्रा. अमोल आव्हाड आभार मानले.