व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयाला ६४ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक यांच्या अंतर्गत बेस्ट कॉलेज पारितोषिक
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर महाविद्यालयाचे विद्यार्थी 64 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या CATC -५१४ एच क्यू आर्टिलरी सेंटर या ठिकाणी झालेले दहा दिवसीय कॅम्प मध्ये महाविद्यालयाला बेस्ट कॉलेज पारितोषिक मिळाले याचबरोबर बेस्ट इन फायरिंग उमेश ताडगे, बेस्ट इन ड्रिल गोकुळ कांगणे, बेस्ट स्पोर्ट गेम महाविद्यालयासाठी पारितोषिक देण्यात आले..
महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या यशाबद्दल
संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपाध्यक्ष उदय भाऊ घुगे, सरचिटणीस हेमंत धात्रक व सहचिटणीस दिगंबर (नाना) गीते संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड,
संस्थेचे संचालक हेमंतशेठ नाईक,समाधान गायकवाड,जयंत आव्हाड, संचालिका नंदाताई बंडूनाना भाबड, संचालक प्रतिनिधी बंडूनाना भाबड साहेब , सेवक संचालक माननीय श्री विवेक गामणे, संस्थेचे वरिष्ठ विभागाची शिक्षणाधिकारी डॉ. शरद काकड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी उमेश पालवे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

digitalnashik_admin




