कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे ७५ वा अमृत महोत्सवी संविधान दिन उत्साहात साजरा

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे ७५ वा अमृत महोत्सवी संविधान दिन उत्साहात साजरा

“समतेवर आधारलेले जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणजे भारतीय संविधान” – प्रा. अंबादास पाचंगे

            रावळगाव: भारतामध्ये संविधान किवा संविधानावर आधारलेले राज्य अशी कोणतेही प्रदीर्घ परंपरा नव्हती. मात्र कोणत्याही प्रकारे अनुकूल पूर्व परिस्थिती नसताना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय परिस्थितीचा व तत्कालीन जगातील अनेक देशांचा व तेथील राज्यपद्धतीचा अभ्यास करून भारतीयांसाठी जे संविधान तयार केलेले आहे, ते जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान असून, त्यामुळेच भारत आज जगात सर्वात मोठा लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून स्वाभिमानाने उभा आहे. भारताच्या बरोबरीने स्वतंत्र्य झालेल्या अनेक देशांची संविधाने अनेक वेळा गडगडली आहेत. परंतु भारताचे संविधान मात्र आजही लोकशाहीचा डोलारा कायम टिकून ताठ मानाने उभे असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतात अनेक जाती,धर्म-पंथ वर्ण असले तरी ही सर्व प्रकारच्या विषमतेला दूर करणारे व समतेच्या तत्त्वावर आधारित असलेले जगातील एकमेव सर्वश्रेष्ठ संविधान म्हणजे भारतीय संविधान होय. असे प्रा. अंबादास पाचंगे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

          श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ७५ वा अमृत महोत्सवी संविधान दिन या कार्यक्रमाचे आयोजन, श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अंबादास पाचंगे हे उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले, तसेच यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विरजवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भरत आहेर यांनी, प्रास्ताविक निकिता पवार या विद्यार्थिनीने केले, त्यात तिने संविधान दिनाच्या आयोजनाचे महत्त्व सांगितले, तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मनोहर राजनोर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यामधून विजय अहिरे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.

             या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माहाविद्याल्याचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर म्हणाले की, जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे भारताचे संविधान असून, या संविधानामुळेच भारताची जगात सर्वात मोठे लोकशाहीवादी राष्ट्र अशी ओळख आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी उद्याच्या स्वतंत्र भारताच्या भवितव्यासाठी पाहिलेल्या जनतेच्या सर्व इच्छा-आकांक्षा साकार करणारे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे असे प्रतिपादन यावेळी केले.

          या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. प्रशांत निकम, प्रा. अदिती काळे, प्रा. मोहिनी निकम, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. प्रांजल पवार, प्रा. जिंकल विरमगामा, प्रा. सोनम पाटील, प्रा.नेहा गांगुर्डे, प्रा. प्रियंका भामरे, प्रा. सविता पवार, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील निकिता पवार, प्रज्ञा उशिरे, शीतल अहिरे, धनश्री पवार, ओम शिंदे, कमलेश अहिरे यांनी विशेष प्रयत्न केले.