क्रांतिवीर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

सिन्नर येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा "क्रांतिवीर करंडक" २०२४-२५ आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उदघाटक ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी केले. यावेळी के. व्ही. नाईक संस्थेचे उपाध्यक्ष उदय घुगे, विश्वस्त बबनराव सानप, नामदेवराव काकड, अशोकराव नागरे तसेच संचालक बाळासाहेब धात्रक, समाधान गायकवाड, जयंत आव्हाड आदी मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. महाविद्यालयाचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही प्रचंड प्रतिसाद राज्यभरातून मिळाला ही बाब महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावणारी आहे, असे प्रतिपादन उदघाटक राजेंद्र देशपांडे यांनी केले. के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय नाशिक येथील इंग्रजी विषयाचे अभ्यासू सेवानिवृत्त प्राध्यापक दिलीप कुटे यांनी या स्पर्धेस उपस्थिती दर्शवली. तसेच आपले दातृत्व दाखवत वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या हेतूने महाविद्यालयास ४० पुस्तके भेट दिली. तरुणाईने वाचन संस्कृती जोपासून अशा स्पर्धेच्या ठिकाणी आपली छाप पाडावी असा आशावाद संचालक जयंत आव्हाड यांनी व्यक्त करीत स्पर्धकांना मार्गदर्शन केले. सदर स्पर्धेचे परीक्षण सुजित काळुंगे व रोहित जाधव यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहन जोतिराम कवडे(पुणे), द्वितीय क्रमांक तेजस दिनकर पाटील(पुणे), तृतीय क्रमांक श्रुती अशोक बोरस्ते ( नाशिक), चतुर्थ क्रमांक अक्षदा दत्ता वडवणीकर (अ. नगर), पाचवा क्रमांक आकाश दत्तात्रय मोहिते (अ. नगर) यांनी प्राप्त केला. तसेच क्रांतिवीर करंडक 2024-25 एच. पी. टी. महाविद्यालय यांच्या संघाला देण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. किशोर पखाले व सर्व प्राध्यापक यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाङ्मय विभाग प्रमुख प्रा. मंगल सांगळे यांनी केले तर क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अमोल आव्हाड यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील SDW अधिकारी प्रा.डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक समन्वयक प्रा. पूनम कुटे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, IQAC समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर चकोर इतर प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.