एसएसके पब्लिक स्कूलच्या Under-17 फुटबॉल संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक
वडझिरे : जी. एम. डी. महाविद्यालय, सिन्नर येथे दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या नाशिक जिल्हा तालुकास्तरीय Under-17 फुटबॉल स्पर्धेत एसएसके पब्लिक स्कूल, वडझिरेच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त, मेहनत व जिद्दीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. या विजयामुळे संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे, संचालिका सौ. उज्वला कातकाडे, मुख्याध्यापिका सौ. सुजाता नंद, व्यवस्थापक अविनाश जेजुरकर सर, क्रीडा शिक्षक प्रथमेश मधे सर, सृष्टी शिंदे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संघाचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशात क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.

digitalnashik_admin




