सिन्नर कृषी विभागाला विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

सिन्नर कृषी विभागाला विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

सिन्नर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी कृषी विभाग, सिन्नर येथे शैक्षणिक भेट देऊन कृषी प्रशासन व शासकीय योजनांची माहिती घेतली.

या प्रसंगी  तालुका कृषी अधिकारी सिन्नर श्री नाठे साहेब यांनी तालुका कृषी कार्यालयामार्फत कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात त्याबाबत माहिती दिली सहाय्यक अधिक्षक श्री प्रशांत नेटावणे यांनी कार्यालयीन कामकाज कसे चालते याबाबत माहिती दिली.ऊप कृषी अधिकारी सिन्नर श्री बाळासाहेब देठे यांनी कृषी विविध योजना प्रत्यक्षात कशा राबविल्या जातात त्या बाबत माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी कु दिव्या भोर यांनी गावपातळीवर कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाते याबाबत माहिती दिली म़डळ कृषी अधिकारी पगार साहेब व सर्व क्षेञीय अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पीकविमा, मृदसंधारण, पीक संरक्षण तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदी, कार्यालयीन कार्यपद्धती आणि योजना अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेतली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषी व्यवस्थापनाबाबत व्यवहार्य ज्ञान मिळाले तसेच स्पर्धा परीक्षा व कृषी क्षेत्रातील करिअर संदर्भात मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट विशेष उपयुक्त ठरली.

या उपक्रमाची संकल्पना, राज्यशास्र विभाग प्रमुख स.प्रा.संतोष आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडत आहे या भेटीदरम्यान राज्यशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी, निकिता सोनवणे.संजीवनी यादव,कांचन कुशारे,प्राजक्ता दराडे,ज्ञानेश्वरी गाडेकर,सुमन राजभहर,प्रियंका बर्डे,ईश्वर सांगळे, अजिंक्य बोडके, शुभम गांजवे, ओमकार रोंडे, निखिल कडवे,सिद्धेश्व आव्हाड, इत्यादी विद्यार्थी व स. प्रा. संतोष आव्हाड, हे यावेळी उपस्थित होते.