सायखेडा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न
ग्राहकांना वस्तू व सेवांबाबत कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक - प्रा.एस. पी. कमानकर
मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री. स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले .या कार्यक्रमासाठी के जी डी एम निफाड महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक प्रा. एस. पी. कमानकर यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे अधिकार , कर्तव्य व दक्षता याबाबत विविध उदाहरणांची समर्पक दाखले देऊन ग्राहकांची समस्या, त्यावरील उपाय योजना व कायदेशीर तरतुदींची विश्लेषणात्मक माहिती न्यायालयीन केसेसच्याद्वारे सोप्या भाषेत सांगितली . सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए .खैरनार, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही .गोसावी, सकाळ सत्र प्रमुख प्रा. शशिकांत मोगल, प्रा.ओम गावले, श्रीमती.कविता पावशे,श्रीमती. सुरेखा रुमने, श्रीमती.सुप्रिया कावळे, श्रीमती.दिपाली पगार, श्रीमती वैशाली खालकर व इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित या व्याख्यानामध्ये प्रा.एस.पी.कमानकर यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे अधिकार , कर्तव्य याबाबत विविध उदाहरणांची समर्पक दाखले देऊन ग्राहकांच्या वस्तू व सेवांबाबत असलेल्या समस्या, त्यावरील उपाय योजना व कायदेशीर तरतुदींची विश्लेषणात्मक माहिती न्यायालयीन केसेसच्याद्वारे सोप्या भाषेत सांगितली. ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याने तक्रार कुठे दाखल करावी? त्याची प्रक्रिया व कार्यशैलीबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख श्रीमती .यु. एस.डेर्ले. तर सूत्रसंचालन प्रा . भाग्यश्री पवार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. एस.पी.मुरादे यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यपकेतर इतर कर्मचारी उपस्थित होते.