गणेशोत्सव निमित्त पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न

गणेशोत्सव निमित्त पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम, या शाळेत गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी गणेश उत्सवा निमित्त  पर्यावरण पुरक गणपती मूर्ती  तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी चित्रकला शिक्षिका पार्वती गोरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशा प्रकारे तयार करावी त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी यांची माहिती दिली व विविध आकारातील गणेश मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच विद्यार्थ्यांनी कृती समजून घेऊन अतिशय सुरेख व सुबक गणेश मूर्ती तयार केल्या.

प्राचार्या डॉ. अंजली सक्सेना, उपप्राचार्य सौ.जयसुधा नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली 

चित्रकला शिक्षिका पार्वती गोरे यांनी  कार्यशाळा घेतली.

 कार्यशाळेत ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला, विद्यार्थ्यांबरोबर पालकही  उपस्थित होते.