एस.व्ही.के.टी. महाविद्यालयाने गाजवली ‘नेहरू युवा महोत्सवाची’ रंगभूमी

एस.व्ही.के.टी. महाविद्यालयाने गाजवली ‘नेहरू युवा महोत्सवाची’ रंगभूमी
एस.व्ही.के.टी. महाविद्यालयाने गाजवली ‘नेहरू युवा महोत्सवाची’ रंगभूमी

भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय नेहरू युवा केंद्र नाशिक आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सव 2022 स्पर्धा भुजबळ मेट नाशिक येथे संपन्न झाल्या. मविप्र समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पच्या सांस्कृतिक विभागाने ग्रुप डान्स स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. रुपये 2001 सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाने प्रवेश मिळवला आहे

विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे डॉ. जयश्री जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. शशिकांत अमृतकर, प्रा. संगिता बोराडे ,श्री. प्रसाद भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. बेरड गौरव, वाघ प्रवीण, पागेरे गायत्री, हांडोरे कल्याणी, आवारे आकांक्षा, बावा खुशी, जाधव श्वेता, भोर साक्षी,गुळवे रेणुका ,पाळदे साक्षी या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला. 

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे दानशूर देणगीदार मा. श्री.  कांतीभाई तेजूकायाशेठ,मविप्र संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष मा. श्री. विश्वास मोरे, सभापती मा. श्री. बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती मा. श्री. देवराव मोगल, सरचिटणीस मा. अॅड नितीन ठाकरे, चिटणीस मा. श्री. दिलीप दळवी ,संचालक मा. श्री. रमेश पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.काळे, उपप्राचार्य  डी.टी.जाधव, डॉ. सोपान एरंडे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि सर्व पंचक्रोशीतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.