नाशिक मनपामध्ये EV द्वारे कचरा व्यवस्थापन आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

नाशिक मनपामध्ये EV द्वारे कचरा व्यवस्थापन आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) भारतद्वारे प्राप्त इलेक्ट्रिक वाहनाचा बचतगट/वस्तीस्तरसंघ (SHG/ALF) द्वारे कचरा वाहतुकीसाठी वापर करून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पचा शुभारंभ.

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) भारत यांच्या सहकार्याने, अभियानांतर्गत महाराष्ट्र व आसाम या राज्यातील निवडक शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचे मानक सुधारण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा यशस्वी प्रकल्प तयार करून निव्वळ शून्य उत्सर्जन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा उपक्रम योगदान ठरणार आहे.

UNDP द्वारे नाशिक मनपाला ६ कचरा वाहक EV उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शहरामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इतर शहरांसाठी एक यशस्वी मॉडेल उभे करणे बाबत सूचित केलेले आहे. त्यानुषंगाने SHG/ALF द्वारे EV वाहनातून शहरातील मंदिरांमधून निर्माल्य संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत

निर्मिती करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम SHG/ALF द्वारे राबविण्यात येणार आहे. SHG/ALF द्वारे EV वाहनातून नजिकचे मंदिरातील निर्माल्य संकलित करून त्याची EV वाहनाद्वारे वाहतूक करून त्या कचऱ्याचे वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती करणे व बाजारात तयार सेंद्रिय खताची विक्री करून कमाई करणे. याप्रकारे मंदिरांमधील कचऱ्याचे शुन्य उत्सर्जन व त्यामधुन महिला बचतगटांना आर्थिक हातभार हा उद्देश ठेवणेत आलेला आहे.

याकामी आज दिनांक 23.09.2025 रोजी  अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर  यांच्या हस्ते सहा कार्यालयीन क्षेत्रनिहाय अभियानांतर्गत स्थापित सहा महिला बचतगटांना इलेक्ट्रिक वाहनांचे हस्तांतरण करण्यात आले. मा. उपायुक्त सुवर्णा दखणे NULM विभाग व मा. उपायुक्त अजित निकत सर घण कचरा विभाग तसेच NULM कर्मचारी व महिला बचतगट सदस्य यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.