भक्ती आव्हाड हिचे सुवर्णयश!

भक्ती आव्हाड हिचे सुवर्णयश!

सिन्नर (प्रतिनिधी): के. व्हि. एन. नाईक सिन्नर महाविद्यालयातील कु. भक्ती रामकृष्ण आव्हाड हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित विभागीय कुस्ती स्पर्धा 2025 मध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाची गवसणी घातली.

ही स्पर्धा मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर (ता. बारामती, पुणे) येथे आयोजित करण्यात आली होती. आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात भक्तीने उत्कृष्ट खेळ करून सुवर्णपदक पटकावले.

यासोबतच तिची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुस्ती संघात झाली असून, ती आगामी अखिल भारतीय विद्यापीठीन कुस्ती स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

भक्तीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कोंडाजी (मामा) आव्हाड, उपाध्यक्ष मा. श्री. उदय भाऊ घुगे, सरचिटणीस मा. श्री. हेमंत (आप्पा) धात्रक, सहचिटणीस मा. श्री. दिगंबर (नाना) गीते, विश्वस्त मा. श्री. नामदेव काकड, संचालक मा. श्री. हेमंतशेठ नाईक, मा. श्री. समाधान गायकवाड, मा. श्री. जयंत आव्हाड, संचालिका नंदाताई भाबड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या यशामागे श्री. रामकृष्ण आव्हाड सर यांचे प्रोत्साहन आणि महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी प्रा. अमोल आव्हाड सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.