बिटको महाविद्यालयात रोजगार मेळावा सम्पन्न....
नाशिकरोड :- " कोणत्याही क्षेत्रात नोकरी करण्यापूर्वी एक मुलाखत प्रक्रिया द्यावी लागते. आपली माहिती समोरच्या कंपनी प्रतिनिधीला शांततेने, आत्मविश्वासाने व धैर्याने सांगून संवाद कौशल्याद्वारे व्यक्तिमत्त्वाची छाप पाडा. केवळ पदवी सर्टिफिकेट असून चालत नाही तर इतर आवश्यक कोर्सेसची तसेच संवाद कौशल्य, सामान्य व संगणक ज्ञान आवश्यकता असावी लागते त्यासाठी विविध चाचण्या यामधून आपली पात्रता सिद्ध करा . योग्य सिव्हि - रिझ्युम तयार करा. मिळालेल्या संधीचे सोने करून भावी जीवनात यशस्वी व्हा , " असे प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात प्लेसमेंट सेल वतीने पीआयबीएम व टीसीएस यांच्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळाव्यात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी उद्घाटन सत्रात व्यासपीठावर डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, डॉ. अनिलकुमार पठारे, पीआयबीएमचे हेड मुकेशकुमार गुप्ता, टीसीएस एच आर टीम प्रतिनिधी पल्लवी बारूह, कॅम्पस रीकृटर अमरेश कुंभार, सागर मोटियानी, मोहित सातपुते, पुष्पर शाह, इंद्रायुधा बॅनजीं, स्वप्नील मुधाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.या मेळाव्यात तृतीय वर्ष पदवी बी ए, बीकॉम,बीएससी, बीएससी संगणकशास्त्र व बायोटेक तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम बीबीए,बीबीए- सीए, एमए भाग १ व २, एम कॉम, एमएससी (रसायन व संगणकशास्त्र ) या विद्यार्थ्यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ( टीसीएस ) , वंडर होम फायनान्स लिमिटेड, कारागया फुड्स प्रायव्हेट लिमिटेड, कोगोपोर्ट कंपनी , हाऊस सीकर्स कंपनी अशा विविध आस्थापनांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. याप्रसंगी पल्लवी बारूह व मुकेशकुमार गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना अपेक्षा व मुलाखत प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. या मेळाव्यासाठी जवळपास १०४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रे सादर केली . प्रत्यक्षात आज इच्छुक विद्यार्थ्यांच्या प्राथमिक प्रातिनिधिक मुलाखती घेण्यात आल्या . या मुलाखत प्रक्रिया व कागदपत्र पडताळणी सुरू राहणार असून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार संधी या मेळाव्यातून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती समन्वयक प्रा.वासिम बेग यांनी दिली .या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. वासिम बेग, यासह समितीतील प्लेसमेंट सेल सदस्य डॉ. मनेष पवार, डॉ. रोहित पगारे, प्रा. नरेश पाटील, डॉ. विजय सुकटे, सचिन बागुल, डॉ. दीपक टोपे, डॉ. सुधाकर बोरसे, प्रा. प्रणाली पंडित यांनी प्रयत्न केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. एस. आर. बोरगावकर यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर यांनी मानले . उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विभागाचे प्राचार्य डॉ. के. सी. टकले यांनी केले.