बिटको महाविद्यालयात एनएसएस व एनसीसी वतीने रक्तदान शिबिर....
नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात संस्थेचे माजी सचिव व महासंचालक तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्व. डॉ. मो. स. गोसावी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी -एअर विंग व विद्यार्थी कल्याण मंडळ तसेच अर्पण रक्तपेढी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नाशिकरोड शाखा सचिव डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, केंद्रीय समन्वय समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ. अंजली कुलकर्णी, नाशिकरोड शाखा सहसचिव डॉ. प्रणव रत्नपारखी, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, उपप्राचार्य डॉ. अनिल कुमार पठारे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. सतीश चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. फारूक मुलाणी , एनसीसी समन्वयक लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे, विद्यार्थी कल्याणकर मंडळाचे अधिकारी डॉ. दीपक टोपे, डॉ. अनिल सावळे, डॉ. उत्तम करमाळकर, डॉ. लक्ष्मण शेंडगे, डॉ. मनेष पवार यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या रक्तदान शिबिरासाठी अर्पण रक्तपेढीच्या सौ. जयश्री पागेरे, सुजाता वाघचौरे, पूजा धिंदळे, श्रेया करपे, सारिका दारोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनात, " रक्तदान श्रेष्ठदान असून त्याचे महत्त्व सांगतांना रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. त्यामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. विशेषतः शरीरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहुन नवीन रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे रक्तदात्याचे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते, " असे सांगितले. अर्पण रक्तपेढीच्या कन्सल्टंट डॉ. आंचल लुथरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना थलेसेनिया आणि सिकल्स सेल बाबत विशेष माहिती देऊन प्रश्नावलीच्या डाटा घेत मार्गदर्शन करून रक्तदान जनजागृती बाबत माहिती दिली. या शिबिरात एकूण ३५ रक्त पिशव्या संकलित झाल्या . तसेच महाविद्यालयाचे स्टाफ यांनी थॅलेसिमिया मायनरची चाचणी घेण्यात आली. शिबिराचे सूत्रसंचालन डॉ. सुधाकर बोरसे यांनी केले तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन सनानसे यांनी मानले.