व्ही.एन.नाईक महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न

व्ही.एन.नाईक महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न

नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात  ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व महाविद्यालयातील वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास या विषयावरील एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा   उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले व कांतिवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलन करून झाली.याप्रसंगी सुप्रसिद्ध युवा उद्योजक हर्षद बेळे, ख्यातनम सॉफ्ट स्किल ट्रेनर शाल्मली शेट्टी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सानप,उपप्राचार्य डॉ.पौर्णिमा बोडके,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शरद काकड,वाणिज्य विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.धीरज झाल्टे,डॉ.रूपाली सानप,प्रा.हेमलता दराडे,प्रा.कैलास चौधरी,प्रा.वैशाली वाघ,प्रा.नवनीत कौर,प्रा.महेश आव्हाड,प्रा.राजश्री बोडके,डॉ.संध्या सोनकांबळे,प्रा.असावा यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय सानप होते.प्रथम सत्रात उद्योजक हर्षद बेळे यांनी व्यापार व उद्योग क्षेत्रातील संधी यावर मार्गदर्शन करतांना सांगितले की नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे,यासाठी विद्यार्थ्यानी उद्योजकीय मानसिकता तयार करायला हवी,विविध भाषा व कौशल्य अवगत करावी,लिंकडीन समाज माध्यमावर आपले अकाऊंट क्रिएट करून त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी हेराव्यात.दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना शल्मली शेट्टी म्हणाल्या की उद्योजकतेविषयी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण गोष्टींचा ध्यास घ्यावा,आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करावा, उद्योजकतेसाठी आवश्यक असणारे कौशल्य अवगत करावी.तिसऱ्या सत्रात उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना ज्येष्ठ उद्योजक तथा ज्योती स्टोरचे संचालक वसंतराव खैरनार म्हणाले की व्यापार व्यवसाय व उद्योगात यश मिळवण्यासाठी संयम व जिद्द फार महत्वाची असते.जीवनात येणाऱ्या अपयशाला व संकटांना न घाबरता सतत प्रयत्न करून कठोर परिश्रम केल्यास चांगले यश मिळत असते. विद्यार्थ्याना त्यांनी काकासाहेब दांडेकर,जयंतराव साळगावकर, विठ्ठल कामत यांनी कशाप्रकारे आपला व्यवसाय उभा केला याची सविस्तर माहिती विको वज्रजंती, कालनिर्णय कॅलेंडर,कामत हॉटेल व्यवसाय इ.उदा. देऊन समजावून सांगितली.अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.संजय सानप म्हणाले की वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना व्यापार व्यवसायात चांगल्या संधी आहे,त्यामुळे समाजाच्या गरजा व समस्या ओळखून व्यापार व्यवसाय सुरू केल्यास विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते.अशा प्रकारच्या कार्यशाळांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकातून डॉ.शरद काकड यांनी या उपक्रमाची भूमिका समजावून सांगितली.डॉ.धीरज झाल्टे यांनी पाहुण्यांचा उपस्थिततांना परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.कॉम.वर्गाची विद्यार्थिनी हर्षदा थोरात व प्रा.हेमलता दराडे यांनी खास शैलीत करून कार्यक्रमात रंगत आणली तर डॉ.रूपाली सानप यांनी आभार मानले.या कार्यशाळेत के.टी.एच.एम.,भोसला, पी.व्ही.जी,भुजबळ नॉलेज सिटी,व्ही.एन.नाईक दिंडोरी व नासिक महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.समारोप कार्यक्रमप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य,उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक तसेच कार्यालय अधीक्षक राजेंद्र तिवडे,सोमनाथ धात्रक,छाया वाघ,निंबा महाजन यांच्यासह कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.