डॉ राम कुलकर्णी यांच्या शतकोत्तर दोन नवीन पुस्तकांचे प्रकाशन

डॉ राम कुलकर्णी यांच्या शतकोत्तर दोन नवीन पुस्तकांचे प्रकाशन

गोखले एज्युकेशन सोसायटी चे विभागीय सचिव डॉ राम कुलकर्णी यांच्या सुजाण पालकत्व 21 सूत्रे आणि Handbook for सिनियर सिटिझन या शतकोत्तर दोन पुस्तकांचे प्रकाशन गोखले एज्युकेशन सोसायटी च्या सेक्रेटरी डॉ सौ दीप्ती देशपांडे आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ सौ अपूर्वा जाखडी यांच्या हस्ते नुकतेच समारंभ पूर्वक करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सहलेखिका श्रीमती रश्मी पोतदार, गोखले एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ आर पी देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ सुहासिनी संत, प्रकल्प संचालक श्री प्रदीप देशपांडे, गुणवत्ता व दर्जा संचालक श्री अक्षय देशपांडे, डॉ सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हँडबुक फॉर सिनियर सिटिझन हे पुस्तक ज्येष्ठ नागरिकां साठी अत्यंत उपयुक्त असून सुजाण पालकत्व 21 सूत्रे हे पुस्तक सर्व पालकांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. हे पुस्तक सानिका प्रकाशन तर्फे श्री सागर कुलकर्णी यांनी प्रकाशित केले आहे.