डॉ. ज्योती गायकवाड यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक 2026' या पुरस्काराचे सिम्बॉयसिस कॉलेज पुणे येथे वितरण...

डॉ. ज्योती गायकवाड यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक 2026' या पुरस्काराचे सिम्बॉयसिस कॉलेज पुणे येथे वितरण...

के.व्ही.एन. नाईक महाविद्यालय सिन्नर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख व आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. ज्योती गायकवाड यांना ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक,पुणे या महाराष्ट्रातील अग्रगण्य मीडिया,इव्हेंट अँड मार्केटिंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे जाहीर झालेल्या 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक 2026' या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 14 जून 2024 रोजी पुणे येथील  सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, विमान नगर येथे करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर उपस्थित डॉ.अजय बोरकर(वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे),  डॉ.मनोज हंबर्डे (मेकॅनिकल डिपार्टमेंट एम.आय.टी.कॉलेज,पुणे), डॉ. प्रेमेंद्र बनसोडे (जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली, पुणे), डॉ. प्रवीण नितनावरे (असोसिएट प्रोफेसर डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आकुर्डी,पुणे), डॉ. तपोबत्रा डे (एच.ओ.डी. मेकॅनिकल डिपार्टमेंट डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आकुर्डी, पुणे) तसेच सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्राचार्य डॉ. श्रीराम गोपाल कृष्णन, मोशन क्लिप चे संस्थापक श्री. बाबासाहेब दिघे व तरुणांना युद्ध कलेचे प्रशिक्षण देणारे ह.भ.प.श्री.अशोक महाराज पवार इ. सर्व मान्यवरांच्या उपस्थिती डॉ. ज्योती गायकवाड यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यांना प्राप्त झालेल्या या सन्मानामुळे महाविद्यालयाचे नाव उंचावले गेले असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.