सिडको महाविद्यालयात स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती कार्यशाळा संपन्न

सिडको महाविद्यालयात स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती कार्यशाळा संपन्न
मतदाना विषयी शपथ देताना समुपदेशक श्री कैलास बोरस्ते, प्राचार्य डॉ सोपान कुशारे, डॉ रविंद्र आहिरे, श्री विलास सोनवणे, श्री सूवित आव्हाड, श्री महेश देवरे व उपस्थित स्वयंसेवक, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
सिडको महाविद्यालयात स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती कार्यशाळा संपन्न
सिडको महाविद्यालयात स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती कार्यशाळा संपन्न

   सिडको - येथील कर्मवीर शांतारामबापू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व क्षेत्रीय संचनालय, युवा व खेळ मंत्रालय महाराष्ट्र व गोवा पुणे कार्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, नाशिक जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "एकदिवसीय स्वच्छता अभियान व राष्ट्रीय मतदार जनजागृती कार्यशाळा" पार पडली.

राष्ट्रीय शहीद दिनाचे औचित्य साधून 2024 च्या क्षेत्रीय संचनालय युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने सॅप अंतर्गत स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 च्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये मतदानविषयी जनजागृती व्हावी, निवडणूक हा एक उत्सव असून तो इतर उत्सवांप्रमाणेच लोकांनी साजरा करावा. लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजाववा, इतर लोकांपर्यंतही हा संदेश पोहचवून समाजात जनजागृती करावी असे मत स्वीप मतदान जनजागृती समुपदेशक श्री.कैलास बोरस्ते व्यक्त केले, त्यांनी उपस्थितांना मतदान करण्याची व करवून घेण्याची शपथ दिली.

मतदान करणे व करवून घेणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. भारतात जर मजबूत लोकशाही आणायची असेल तर सर्वांनी निसंकोच मतदान केले पाहिजे, अलीकडे लोकांचा निवडणुकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे परंतू तसे होऊ न देता युवा पिढीने आपल्या मतातून एक बळकट लोकशाही उभी करण्याची गरज आहे यासाठी असे मतदान जनजागृती कार्यक्रम होणे आवश्यक आहे असे मत डॉ सोपान कुशारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.

एक दिवसीय कार्यशाळेची रूपरेषा व प्रास्ताविक डॉ रविंद्र आहिरे, रासेयो नाशिक जिल्हा समन्वयक यांनी केले, सूत्रसंचालन प्रा वर्षा शिरोरे व आभार प्रा शुभम गव्हाणे यांनी मानले.

सदर कार्यशाळेसाठी नाशिक जिल्हा निवडणुक अधिकारी मा.शशिकांत मंगळूरे व सहा.निवडणुक अधिकारी सौ.शुभांगी भारदे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यालयातील मतदान समुपदेशक श्री. विलास सोनवणे, श्री. सुवित आव्हाड, श्री. महेश देवरे, उपप्राचार्य प्रा पी के पानपाटील, स्टाफ सेक्रेटरी प्रा एस टी घुले, श्री वैभव खडांगळे, महाविद्यालयातील स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.