ऋतुरंग भवन मध्ये ५ एप्रिल रोजी ' मेहेकती यादे ' हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम

ऋतुरंग भवन मध्ये ५ एप्रिल रोजी ' मेहेकती यादे ' हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम

नाशिकरोड :       एस व्ही कराओके सिंगिंग क्लब   आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकती यादे -आवाज दो हमको हम खो गये ' या बहारदार संगीत मैफिलीचे ( पुष्प १ ले ) रविवार  दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या मैफिलीत  एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार असून हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता  येणार आहे . या सांगितिक मैफिलीत गायक संजय परमसागर यासह गॉडविन लुईस, वनिता आहेर, कैलास कपाटे, रेखा ठाकूर,  अनिल व्यवहारे, मोनाली सारंगधर, मोहन निकम, जितेंद्र दिवे , योगिता जोहरी, अनुपमा क्षीरसागर, शांताराम घुगे, जयवंत गांगुर्डे, स्वप्ना गोखले, प्रज्ञा गोपाळे , संजय दुलगज, अनिल पांचाळ, सुदेश आमेसर, अस्मिता कुलकर्णी , राधिका गांगुर्डे आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर  करणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन रोहिणी सोनार करणार आहेत आहेत . कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित ५ भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तु दिली जाईल. तसेच १० भाग्यवंत हौशी रसिकांसाठी  १ महिन्याचा एस व्ही कराओके गायन सभासदत्व मोफत कुपन मिळेल. कार्यक्रमास प्रवेश मोफत असून  जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित रहावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी संयोजकांनी कळवले आहे .