ऋतुरंग भवन मध्ये १७ मे रोजी ' मेहेकी यादे - तुमसे ही ' बहारदार गीतांचा कार्यक्रम

ऋतुरंग भवन मध्ये १७ मे रोजी ' मेहेकी यादे - तुमसे ही '  बहारदार गीतांचा कार्यक्रम

नाशिकरोड :       एस व्ही कराओके सिंगिंग क्लब नाशिकरोड   आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकी यादे - प्यारकी बाते ' तुमसे ही ' या बहारदार संगीत मैफिलीचे ( पुष्प ३ रे ) रविवार  दि. १७ मे रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या मैफिलीत  एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार असून विविध आवडत्या गाण्यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता  येणार आहे . या सांगितिक मैफिलीत गायक संजय परमसागर यासह गॉडविन लुईस, वनिता आहेर, श्याम शहाणे, किशोर भारती, नितीन केदारे, संजय साळवे , जितेंद्र दिवे, शांताराम घुगे, स्मिता पोटे,स्वप्ना गोखले, प्रज्ञा गोपाळे , अनिल पांचाळ, सुदेश आमेसर, जगन चव्हाण, रोहीत कुलकर्णी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर  करणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन रोहिणी सोनार करणार आहेत . कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित १० भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तु दिली जाईल.  कार्यक्रमास प्रवेश मोफत असून  जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित रहावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संयोजकांनी कळवले आहे .