प्रा. नरेश पाटील यांना पीएच.डी प्राप्त....
नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील भूगोल विभागातील सहा. प्रा. नरेश पाटील यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वतीने नुकतीच पीएचडी प्राप्त झाली. त्यांना धुळे नगाव येथील महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुरेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा विषय " एप्लीकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस फॉर डिटेक्टींग अर्बन ग्रोथ चेंजेस : अ केस स्टडी ऑफ नाशिक सिटी " हा होता.
त्यांच्या या सुयशाबद्दल संस्थेच्या डायरेक्टर जनरल व सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे व कार्यकारिणी यासह महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, भूगोल विभागातील सर्व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.


digitalnashik_admin




