स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कारासाठी डॉ. राजेंद्र जाधव यांची निवड
भगूर : शिवविजय फाऊंडेशन, भगूर यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते. यावर्षी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार - २०२६” साठी मा. डॉ. राजेंद्र जाधव (ता. जि. नाशिक) यांची निवड करण्यात आली आहे.
शिवविजय फाऊंडेशनच्या निवड समितीने डॉ. जाधव यांच्या आरोग्य क्षेत्रातील सामाजिक व उल्लेखनीय कार्याची दखल घेत एकमताने ही निवड केली असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि. २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवविजय फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. राजेंद्र जाधव यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


digitalnashik_admin




