नारळी पौर्णिमेनिमित्त रसिक सूर नाशिककडून कोळी गीतांचा सुरेल कार्यक्रम

नारळी पौर्णिमेनिमित्त रसिक सूर नाशिककडून कोळी गीतांचा सुरेल कार्यक्रम

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नाशिककर रसिकांसाठी एक खास संगीत मेजवानी घेऊन येत आहे – ‘रसिक सूर नाशिक’ प्रस्तुत धमाकेदार मराठी कोळी गीतांचा कार्यक्रम.
हा कार्यक्रम 8 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता, परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात पारंपरिक कोळी गीतांचा रंगतदार संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना हिमांशू धोडपकर यांची असून, निवेदन भूमिका भावना कुलकर्णी सांभाळणार आहेत. कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे यांची आहे.

कार्यक्रमातील सहभागी कलाकार:
सौ. अनघा ताई धोडपकर (संस्थापिका), हिमांशू धोडपकर, सचिन सोनावणे, अतुल कुलकर्णी, अनुपमा क्षीरसागर, नितीन केदार, पल्लवी पगार, शैलेश कुलकर्णी, स्वाती जाधव, मंगेश प्रधान, सोनिया जाधव, मधुकर नाठे, माधवी भसे आणि उल्हास भसे.

समुद्रकिनाऱ्यावरील कोळी जीवनशैली, त्यांची संस्कृती आणि श्रमशीलता यांचे संगीतात्मक दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पारंपरिक वाद्यांची आणि रचना शैलीची सुद्धा सरमिसळ पाहायला मिळणार आहे.

रसिक सूर नाशिक या संस्थेच्या वतीने दरवर्षी संगीताचे दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात येतात. यावर्षी नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

प्रवेश विनामूल्य असून, सर्व रसिकांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आयोजकांचे आवाहन आहे.