ऋतुरंग आणि स्वरांगण प्रस्तुत स्वरांगण संगीत गुरुकुल चा नाशिक रोड येथे शुभारंभ
नाशिक रोड मध्ये प्रथमच ऋतुरंग आणि स्वरांगण या संस्थे तर्फे स्वरांगण संगीत गुरुकुल स्थापन करण्यात आले आहे..!!
ज्येष्ठ गायक व गुरु पंडित शंकरराव वैरागकर आणि ऋतुरंगचे अध्यक्ष श्री विजय संकलेचा यांच्या हस्ते गुरुकुलाचे उद्घाटन झाले..!
प्रसंगी अभिजीत भाटजीरे, चैतन्य विसपुते, स्वरांगी बिडवई, साक्षी अनवडे, भक्ती नांदुर्डीकर आणि धनश्री सिमंत यांनी तू बुद्धी दे तू तेज दे ही प्रार्थना सादर केली..!!
याप्रसंगी ऋतुरंगचे श्री संतोष जोशी श्री सुभाष पाटील श्री प्रकाश पाटील वसंतदादा नगरकर, स्वरांगणचे श्री प्रफुल्ल कुलकर्णी,नामदेव गाढवे, संतोष खडके, राहुल हिंगे, ज्ञानेश्वर कर्पे, गोपाळ मोजाड, श्री विलास सोनवणे, श्याम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते..!!

नाशिक रोड मध्ये चांगल्या दर्जाची विद्या या गुरुकुलातून विद्यार्थ्यांना मिळत राहील आणि चांगले संगीत साधक या गुरुकुलातून कलाकार म्हणून निर्माण होतील असा विश्वास प्रख्यात गायक पं. शंकरराव वैरागकर यांनी व्यक्त केला..!!
गुरुकुल शिक्षण पद्धती हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि गुरु शिष्य परंपरेचा आत्मा आहे आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न ऋतुरंग आणि स्वरांगणमार्फत होत आहे..!!
चांगल्या दर्जाची विद्या ही तळागाळातल्या आणि दुर्गम भागातल्या मुलांपर्यंत पोहोचावी हाच उद्देश या गुरुकुलाचा आहे असे प्रास्ताविक स्वरांगणचे संस्थापक अध्यक्ष श्री सागर कुलकर्णी यांनी केले..!!
श्री गोपाळ मोजाड यांनी कार्यक्रमाचे उतनिवेदन केले..!!
हिंदुस्तानी शास्त्रीय गायन, हार्मोनियम आणि तबला हे विषय या गुरुकुलात शिकविले जाणार आहे तरी या गुरुकुलाचा लाभ सर्व नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष श्री संगीत कुलकर्णी यांनी केले आहे

digitalnashik_admin




