राष्ट्रीय निपमच्या "राष्ट्रीय निवडणूक अधिकारी" एडवोकेट (Dr)श्रीधर व्यवहारे यांची नेमणूक
कोलकता - येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट "निपम" या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची द्वय-वार्षिक निवडणूक वर्ष 2025 ते 2027 संपूर्ण भारतात संपन्न होत आहे.
निपम च्या संपूर्ण भारतात 53 शाखा असून मुख्य कार्यालय कोलकता येथे आहे.
या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकचे एडवोकेट (DR) श्रीधर व्यवहारे यांची सातत्याने दुसऱ्यांदा "राष्ट्रीय निवडणूक अधिकारी" या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. एडवोकेट (Dr) श्रीधर व्यवहारे हे गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रीय कार्यकारणीवर काम करीत आहेत.
ते संस्थेचे माजी
सह-जनरल सेक्रेटरी या पदावर कार्यरत होते. त्यांना राष्ट्रीय निपम ने , त्यांनी केलेल्या विविध योगदानाबद्दल "राष्ट्रीय फेलोशिप" प्रदान केलेली आहे. तसेच त्यांनी निमा , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या विविध संस्थांवर विविध पदांवर विविध पदे भूषविलेली आहेत.
त्यांच्यासोबत त्री-सदस्य समितीत , कोची- केरळ येथील श्री प्रेमचंद यांची मुख्य निवडणूक अधिकारी व तसेच राजमुंद्री,आंध्र प्रदेश येथील श्री. पी आर के राजू यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. एडवोकेट श्रीधर व्यवहारे हे सातत्याने विविध क्षेत्रात सामाजिक ,आर्थिक शैक्षणिक, औद्योगिक, सहकार ,बँकिंग, कामगार आणि ग्राहक सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी आयमा- AIMA-NASHIK, या संस्थेच्या इलेक्शन ऑफिसर म्हणून दोन वेळा काम केलेले आहे.
"पीपल्स बँके"च्या बचाव कार्यात मोलाचे योगदान केलेले आहे.
चॅरिटी कमिशनर नाशिकने त्यांची "निमा" NIMA-NASHIK, या संस्थेवर "विश्वस्त" म्हणून नेमणूक केलेली आहे.
वीज ग्राहक नियमक मंडळाच्या, ग्राहक समस्या निवारण केंद्रात- CGRF- Consumer Grievances Redressal Forum, Nashik- DIVISION- "अर्धन्यायिक ग्राहक सदस्य" म्हणून काम केले आहे.

digitalnashik_admin




