डॉ. राम कुलकर्णी व सौ. नीता कुलकर्णी यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी व प्राध्यापिका सौ. नीता कुलकर्णी यांनी लिहिलेल्या महात्मा गांधी, लोकमान्य टिळक शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद या चरित्र पुस्तकांचे प्रकाशन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्य डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी असे प्रतिपादन केले की ही सर्व चरित्रे लहान मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी व व संस्कारक्षम आहेत. नाशिक येथील आरुष प्रकाशनच्या श्री अनिल क्षीरसागर यांनी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. सौ दीप्ती देशपांडे, डॉ. राम कुलकर्णी, श्री गौतम शेठ क्षत्रिय, डॉ. लक्ष्मीकांत जोशी व डॉ.लीना भट आदी मान्यवर उपस्थित होते. भिकुसा दिन या कार्यक्रमात या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

digitalnashik_admin




